आपल्या आवाजाने शेकडो गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक कुमार सानू यांच्यावर मोठे संकट उभे टाकले आहे. कुमार सानूचा मुलगा जान सानू याने चक्क वडीलावरच गंभीर आरोप लावले आहेत. जान सध्या बिग बॉस 14 च्या सीझन मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. तिथेच त्याने काही मोठे खुलासे केले आहेत.
कुमार सानू यांचा मुलगा म्हणून स्पर्धेत उतरलेला जान सानू याने वडीलावरच ताशेरे ओढले आहेत. एका एपिसोड मध्ये आपल्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना जान ने म्हटले, “माझ्या आईनेच मला सांभाळले आहे. तीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझी आई आणि वडील दोन्ही तीच आहे.”
खरे तर जान सानू हा त्याच्या आईचे कौतुक करीत होता, परंतु हे बोलताना तो विसरला की तो कुमार सानू बद्दल वाईट बोलत आहे. पुढे तो म्हणाला, “माझी आई 6 महिन्याची गरोदर असतानाच वडील कुमार सानू यांनी माझ्या आईला घटस्फोट दिला होता. मला आईनेच लहानाचे मोठे केले आहे.”
“माझ्या वडिलांनी माझा जराही सांभाळ केला नाही. बिग बॉसच्या घरात येताना आईकडे कोण लक्ष देईल याचीच मला काळजी वाटत होती.” असे पुढे जान म्हटला. जान हा कुमार सानूच्या पहिली पत्नी रीताचा मुलगा आहे. जानला दोन सख्ये भाऊ आहेत. नंतर कुमार सानु यांनी सलोनी सोबत दुसरे लग्न केले व त्यांना एक मुलगी आहे व दुसरी मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे.