एखाद्या कलाकाराने साकारलेल्या पात्रावरून त्याच्या खऱ्या आयुष्यातील राहणीमान ठरवू शकत नाही. मालिकेत अत्यंत साध्या रुपात दिसणारे काही कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच स्टायलिश दिसत असतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे लागिर झालं जी मालिकेत जयडीचे पात्र साकारणारी अभिनेत्री होय.
लागिर झालं जी मालिकेत मध्यंतरी पहिल्या जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किरण धाने हीने मालिका सोडली होती. त्यामुळे हे पात्र अभिनेत्री पूर्वा शिंदे हीने साकारले. अगोदर चेहऱ्यावरील हावभावामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या पूर्वा ने जयडीचे पात्र उत्तमरित्या साकारले होते.

मालिकेत ग्रामीण भागातील साडी मधील लुक मध्ये दिसून आलेली पूर्वा खऱ्या जीवनात खूपच वेगळी आहे. सोशल मीडिया वर तीचे एकापेक्षा एक बोल्ड फोटोज् पाहायला मिळत असतात. तिच्या याच फोटोंमुळे ती युवा पिढीचे आकर्षण ठरत असते. तिच्या फोटोज् पाहून बॉलिवुडच्या अभिनेत्री देखील तिच्यासमोर फिक्या वाटतात.
पूर्वा ही अभिनया प्रमाणेच उत्तम डान्सर देखील आहे. झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये तीने तिच्या डान्सचे जलवे दाखविले आहेत. तो शो अपूर्ण राहिला नसता तर कदाचित त्या शो ची विजेती पूर्वा हीच राहिली असती. मराठीतील या नवोदित अभिनेत्रीच्या कलागुणांना पाहून तीचे भविष्य उज्वल असणार हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.