प्रेम हे कधीही कोणावरही होवू शकते. कोणालाही कोणत्याही व्यक्तीवर कधीही प्रेम होवू शकते. कधी कधी एखाद्या व्यक्तीबद्दल इतकी जवळीकता वाटते की त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी सोबत ठेवावे वाटत असते. आता असेच एका प्रेमाचे उदाहरण समोर आले आहे.

ही प्रेमकहाणी आहे अंजली चक्रा आणि संदस(सुफी) मलिक या दोघींची आहे. अंजली ही भारतीय असून सुफी पाकिस्तानी आहे. या दोघींची ओळख 8 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. त्यावेळी सुफी हीने सोशल मीडियावर ले.सबियन असल्याचा उल्लेख केला होता. नंतर ती पोस्ट पाहून अंजलीने तिला मेसेज केला होता.
सुरुवातीला अंजलीला हे माहिती नव्हते की सुफीला मुलींची आवड आहे. त्यावेळी अंजली एका मुलासोबत रिलेशन मध्ये होती. नंतर बोलत बोलत दोघींनी एकमेकांच्या भावना शेयर केल्या. दोघींची घट्ट मैत्री झाली.

सुफी अगोदरच न्यू यॉर्क, अमेरिका येथे राहत होती. नंतर अंजली फिरण्यासाठी न्यू यॉर्क येथे गेल्यानंतर दोघींची तिथे भेट झाली. नंतर काही भेटीतच दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. काही वर्ष रिलेशन मध्ये राहिल्यानंतर दोघींनी 31 जुलै 2018 रोजी लग्न केले.
लग्न केल्यानंतर अंजली व सुफी सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरल्या. भारतात तर समलिंगी विवाहाला परवानगी मिळाली असली तरी पाकिस्तान मध्ये यासंबंधी असा कोणता कायदा नाही आहे. सध्या दोघी अमेरिकेतच वास्तव्यास असून दोघींच्या अनेक फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.