झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. मालिकेची खलनायिका नंदिता परत आली खरी, परंतु आता धनश्री कडगावकर हे पात्र साकारणार नाही. तिच्या ऐवजी आता माधुरी पवार मालिकेत दिसून येत आहे. माधुरी पवार नेमके कोण आहे हे जाणून घेऊयात.
माधुरी पवारचा जन्म धुळे जिल्ह्यातील हिसाळे या गावात 21 मार्च, 1993 रोजी झाला आहे. तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नंदुरबार येथे झाले. अगोदरपासूनच अभिनयाची आवड असलेल्या माधुरीला टिकटॉक मुळे अधिक लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तीचे असंख्य फॉलोअर्स होते व ती युवा पिढीची आकर्षण बनली होती.
माधुरी ही या अगोदरही टेलिव्हिजन वर आली असून ती झी युवा वरील अप्सरा आली या डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता. 2019 मधील या शो ती विजेती देखील झाली होती. त्यामुळे अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डान्सचा हा एक व्हिडिओ :
धनश्री काडगावकर सारखाच तीचा थोडाफार चेहरा असल्याने तिला नंदिताच्या पात्रासाठी निवडण्यात आले. मालिकेच्या सुरुवातीला तिला स्वीकार करणे प्रेक्षकांना अवघड जात असले तरी तिने उत्तम अभिनय करीत असल्याचे दिसून येत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.