गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळेच झी मराठीच्या सर्वच मालिका टीआरपीच्या बाबतीत पुढे असायच्या. परंतु गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीच्या मालिकांप्रती प्रेम कमी झालेले पाहायला मिळत आहे. टीआरपी संदर्भात आलेल्या नवीन आकडेवारी मध्ये झी मराठीच्या टॉप 5 मध्ये फक्त दोनच मालिका आहेत.

marathi serial top five


टीआरपी ची ही आकडेवारी 19 ते 25 सप्टेंबर या आठवड्यातील आहे. टॉप 5 मध्ये पाचव्या क्रमांकावर झी मराठीवरील “माझा होशील ना?” ही मालिका आहे. या यादीत चौथा क्रमांक “सुख म्हणजे नक्की काय असते” या मालिकेने पटकाविला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर झी मराठीची लोकप्रिय मालिका “माझ्या नवऱ्याची बायको” ही आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला मागे टाकत स्टार प्रवाह वाहिनीवरील “सहकुटुंब सहपरिवार” ही मालिका दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. टीआरपी च्या या यादीत स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका “रंग माझा वेगळा” या मालिकेने अव्वल स्थान पटकाविले आहे.

marathi serial top five


दीपा व कार्तिकच्या प्रेम कहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यानेच मालिकेला हे यश मिळू शकले. याबद्दल मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मालिकाप्रमानेच स्टार प्रवाह या वाहिनीने झी मराठीला मागे टाकले आहे. स्टार प्रवाह वाहिनीचा जिआरपी 287 असून झी मराठीचा जीआरपी 274 इतका झाला आहे. तरी येणाऱ्या काळात या आकडेवारीत बदल होवू शकतो.

तुम्हाला कोणती मालिका आवडते ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *