सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. व्हायरल झाल्यामुळे त्या गोष्टीची सर्वत्र चर्चा होवू लागते. सध्या सोशल मीडियावर एका पोस्ट्सची स्क्रीनशॉट व्हायरल होताना दिसून येत आहे. या स्क्रीनशॉट मधील कमेंट मुळे अनेक पालकांना संदेश देखील दिला आहे.
एका विवाहित पुरुषाने “वाचनवेडा” या फेसबुक ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्ट मध्ये त्यांनी असे लिहिले होते, “2 वर्षीय मुलासाठी अभ्यासाठी कोणती पुस्तक उपयोगी पडतील, कृपया मार्गदर्शन करावे.” त्यांनी टाकलेली ही पोस्ट कदाचित त्यांच्या पाल्यासाठी टाकली असावी.
त्यावर संहिता दांडेकर नामक एका महिलेने असे उत्तर दिले, “इंजिनियरिंगची घ्या, खरतर उशीरच झाला आहे, पण सुरुवात करा.” संहिता यांची अशी टोचक कमेंट वाचून अनेक जणांना हसू आवरले नाही. परंतु संहिता यांच्या या कमेंट मधून पालकांनी काहीतरी शिकण्यासारखे आहे.
आजच्या आधुनिक युगात पालक आपल्या पाल्यांना 3-4 वर्षाचे झाल्यापासूनच शिक्षण घेण्यास प्रवर्त करतात. यामुळे अनेक बाळांचा शारीरिक व मानसिक विकास हवा तसा होत नाही. यामुळेच संहिता यांनी ती कमेंट करून करून लहान बाळावर खेळण्याच्या वयात शिक्षणाचे ओझे टाकू नये, असेच जणू सांगितले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.