2 महिन्यापूर्वी मराठी अभिनय क्षेत्रातील एक अत्यंत दुःखद घटना घडली होती. 29 जुलै 2020 रोजी अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आशुतोषच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख ही खूपच दुःखात बुडाली होती. आता पहिल्यांदाच मयुरीने व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मनातील दुःख बाहेर काढले आहे.
मयुरीने आशुतोशच्या निधनानंतर त्याच्या वाढदिवशी केलेल्या पोस्ट वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असणार. परंतु मयुरीने प्रथमच व्हिडिओ पोस्ट करून तीच्या एका मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मयुरीने अश्रुभरीत डोळ्यांनी आशुतोष देखील आठवण काढली. श्वेता भांगले नामक मैत्रिणीला शुभेच्छा देत तीचे आभार देखील मांडले.
मयुरीने व्हिडिओ मध्ये असे म्हटले, “माझ्याकडून व आशुकडून श्वेता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशुला कधीच व्यक्त करता येत नव्हते, त्यामुळे त्याने तुला कधीच सांगितले नाही की तू त्याच्या आयुष्यात किती कृतज्ञ आहेस. श्वेतू माझी बेस्ट फ्रेंड असून देखील आशुतोषला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी तिने मदत केली.”
“मला माहिती नाही, तुझ्याशिवाय आम्ही बरेच टप्पे कसे पार केले असते. मैत्रीचा खरा अर्थ काय असतो हे तू दाखविलीस श्वेता. जर आशू एक चमकणारा तारा असेल तर तो तुझ्यावर जास्त उजेड टाकेल अशी मी आशा करते. आशू देखील गर्व करीत असेल की तू माझी मैत्रीण आहेस.” असे भावूक शब्दात मयुरीने पुढे बोलले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका