2020 या वर्षात कोरोनाने अनेक जीव गमावलेच, परंतु त्याच बरोबर कला क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे दुःखद निधन देखील झाले. या मध्ये साउथचा अभिनेता चिरंजीवी सरजा 9 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते. चिरंजीवी सरजा हा कन्नड सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता होता.
चिरंजीवी सरजा यांनी लोकप्रिय अभिनेत्री मेघना राज हिच्यासोबत 2018 मध्ये विवाह केला होता. त्यापूर्वी दोघांची आठ वर्ष एकमेकांसोबत प्रेम देखील होते. चिरंजीवीच्या मृत्यूने मेघना पूर्णपणे खचून गेली होती. दुःखाची गोष्ट म्हणजे चिरंजीवीच्या मृत्यू वेळी मेघनाच्या पोटी 4 महिन्याचे बाळ होते.
पोटात बाळ असल्याने मेघनाला जरा जास्तच दुःख झाले होते. मेघना ने मागे पोस्ट करीत चिरंजीवी साठी म्हटले देखील होते की मी तुझ्या बाळाची काळजी घेईन आणि त्याचे छान स्वागत देखील करेल. मेघना ने चिरंजीवीचे स्वप्न पूर्ण करत डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला व त्याचे काही फोटोज् देखील सोशल मीडियावर पोस्ट केले.
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात मेघना ने स्वर्गीय पती चिरंजीवी चे पोस्टर तिच्या बाजूला लावले होते. हे फोटोज् पाहून फॅन्स ना देखील अश्रू आवरता येत नाहीत. कार्यक्रमात मेघना जरी आनंदी दिसत असली तरी तिने जड अंतकरणाने हा कार्यक्रम साजरा केला असणार हे नक्की. लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याने मेघना सोबत असंख्य फॅन्स देखील आनंदी आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.