गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून झी मराठीच्या काही मालिकांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. प्रेक्षकांनी विनंती करून देखील काही मालिकांमध्ये बदल करण्यात येत नव्हते. परंतु आता झी मराठीची “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत आता मोठा बदल होणार आहे. हा महत्वाचा बदल झाल्याने फॅन्स देखील खुश झाले आहेत.

“तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत सुरुवातीपासूनच अनेक बदल करण्यात आले होते. कायम उत्तम टीआरपी मिळविणाऱ्या या मालिकेची लोकप्रियता गेल्या काही महिन्यांपासून कमी झाली होती. खरे तर मालिकेची खलनायिका नंदिता हे पात्र गेल्यापासून मालिकेत रस उरला नव्हता. परंतु आता या मालिकेत नंदिताचे पुनरागमन होणार आहे.
मालिकेत नंदीताला कारावासाची शिक्षा भोगावी लागली असल्याने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला मालिकेतून बाहेर जावे लागले होते. धनश्री आता गरोदर असल्याची बातमी सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मालिकेत तिच्या ऐवजी कोण नंदिताचे पात्र साकारनार हा प्रश्न सर्वांना पडला होता. नवीन प्रोमो मध्ये नंदिता ते दिसतेय पण चेहरा दाखविण्यात आला नव्हता.

आता मालिकेत नंदिताची भूमिका माधुरी पवार ही अभिनेत्री साकारणार आहे. माधुरी ही थोडीफार धनश्रीसारखेच दिसते. धनश्री सारखेच माधुरी नंदिताचे पात्र साकारणार का हे येणारा काळच सांगू शकेल. परंतु नंदिताचे आगमन झाल्याने मालिका परत प्रसिध्दी मिळविणार हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.