भारताचे लोकप्रिय गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेली नेहा आज टॉपची गायिका बनली आहे. नेहाच्या फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे की ती एका पंजाबी गायकासोबत विवाह करणार आहे.
नेहा कक्कर आणि गायक रोहन प्रीत सिंग हे दोघे या महिन्याच्या शेवटी दिल्ली येथे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही महिन्यापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात असून त्यामुळेच दोघांनी लग्नाचा विचार केला असल्याचे सूत्राकडून कळाले आहे. दोघांची एकत्र खूप सुंदर जोडी देखील वाटत आहे.
काही दिवसापूर्वी नेहा ने रोहन प्रीत सोबतचा एकत्र व्हिडिओ पोस्ट केला होता. “डायमंड दा छल्ला” या नेहाच्या अल्बम असलेल्या त्या व्हिडीओ साठी नेहाने असे कॅप्शन टाकले होते. “आजपर्यंत पाहिलेल्या गोड मुलासोबत ‘डायमंड दा छल्ला.’ खूप प्रेम. तू खूपच सुंदर आहे रोहन प्रीत सिंग”. या व्हिडिओ नंतर नेहाचे नाव रोहन प्रीत सोबत जोडले गेले.
नेहाचे नाव यापूर्वी गायक आदित्य नारायण याच्याशी जोडले गेले. परंतु त्या दोघांचे प्रेम एका रिऍलिटी शो पुरतेच मर्यादित होते. तसेच, नेहाचे हा हिमांश कोहली या अभिनेत्यासोबत 4 वर्ष प्रेम संबंध होते. नेहाच्या लग्नाबद्दल बोलताना हीमांश म्हणाला, “नेहा तिच्या आयुष्यात पुढे जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे व मी त्यासाठी आनंदी आहे. मी तिचा नेहमीच एक शुभचिंतक आहे.”
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.