मराठी चित्रपट सृष्टीत अभिनय करताना यश मिळविल्यानंतर महेश कोठारे यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्माते यात देखील यश मिळवले. नंतर त्यांच्या “कोठारे व्हिजन” ने टीव्ही मालिकांकडे कल वाढविला. “जय मल्हार” या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मालिकांची निर्मिती केली. आता कोठारे व्हिजनची “दख्खनचा राजा ज्योतिबा” ही मालिका लवकरच टीव्हीवर दिसणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक भक्तांना ज्योतिबाचे दर्शन झाले नाही. आता मालिकेच्या निमित्ताने सर्व भक्तांना घरी बसून दर्शन घेता येईल. या मालिकेची शूटिंग कोल्हापूर येथे होणार असून त्यासाठी कोल्हापूर येथेच भव्य दिव्य सेट उभारण्यात आला आहे. जय मल्हार मालिकेप्रमानेच या मालिकेला देखील यश मिळेल असे गृहीत धरूनच महेश कोठारे हे मालिकेसाठी जास्त खर्च करताना दिसून येत आहेत.
दिमाखदार पद्धतीने उभारण्यात आलेल्या या सेट वर श्री ज्योतिबाचा दरबार, अंबाबाईचा दरबार, आश्रम, रत्नागिरी गाव असे सर्वच साकारण्यात आले आहे. या मालिकेचे दिग्दर्शन स्वतः महेश कोठारे व मुलगा आदिनाथ कोठारे करणार असून मालिकेत ज्योतिबाच्या भूमिकेत “विशाल निकम” हा अभिनेता दिसून येणार आहे. या मालिकेसाठी विशाल ने 20 दिवसात तब्बल 12 किलो वजन वाढविले आहे.
कोणती मालिका होणार बंद?
“दख्खनचा राजा ज्योतिबा” ही मालिका 23 ऑक्टोंबर पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर येणार असून या मालिकेची वेळ संध्याकाळी 6.30 वाजता आहे. सध्या 6.30 वाजता देवयानी या मालिकेचे पुनः प्रसारण होत असल्याने त्या ऐवजी ही नवीन मालिका दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीच चालू मालिका बंद होणार नाही. परंतु पुढील काळात या मालिकेचा वेळ बदल होवू शकतो.
मालिकेची तुम्ही प्रतीक्षा करीत असाल तर कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.