सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशी करीत असताना बॉलिवुडचे ड्रग्स कनेक्शन उघड झाले. यात सुशांतची गर्लफ्रेंड रीया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. परंतु उच्च दर्जाचे जीवन जगणारी रिया जेल मध्ये 29 दिवस कशी राहिली असेल हा प्रश्न तिच्या फॅन्स ना वाटत होता.
रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रीयाची जामीनावर सुटका केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, “रियाला भेटण्यासाठी मी अधून मधून जायचो. रियाने बाकी कैद्यासारखेच तुरुंगात दिवस काढले आहेत. कोरोना मुळे रियाला घरचे जेवण खाण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने तिथे उपलब्ध असेल तसेच जेवण केले.”
“प्रत्येक दिवस रियासाठी कठीण गेला. त्यामुळे स्वतःचे सकारात्मक विचार ठेवण्यासाठी रियाने योगा करण्याचा निर्णय घेतला. रियाने स्वतः तर योगा केलाच परंतु तीने भायखळा तुरुंगातील इतर कैद्यांना देखील योगा करायला शिकवले.” असे मानेशिंदे यांनी पुढे बोलताना सांगितले.

रियाच्या या कार्यामुळे तीचे सर्वांना कुतूहुल वाटत आहे. “रियाची झालेली अटक ही तिच्यावर झालेला अन्याय होता. त्या अन्यायाविरुद्ध लढण्यास रीया आता सक्षम आहे.” असे देखील माने शिंदे यांनी म्हटले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका