अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांचा गेल्या काही महिन्यांपासून लग्न, साखरपुडा असे अनेक कार्यक्रम पार पडलेले ऐकायला मिळाले. त्यामुळे कलाकारांनी आपला जोडीदार निवडून आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली. आता त्यामध्ये आणखीन एका अभिनेत्रीची भर पडल्याचे ऐकायला मिळत आहे.

मराठी टीव्ही इंडस्ट्री मध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हीचा विवाह झाल्याचे उघड झाले आहे. खरे तर रुपालीचे लग्न कधी झाले याबद्दल कोणालाच कल्पना नाही. परंतु तिच्या एका पोस्ट मुळे हे उघडकीस आले आहे. रुपालीच्या लग्नाच्या फोटोज् देखील आणखीन समोर आल्या नाहीत.
रुपाली सध्या “आई कुठे काय करते?” या मालिकेत संजनाची भूमिका साकारत असून त्यात तीचे अनिरुद्ध सोबत प्रेम असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र रुपाली अंकित मगरे या मुलाच्या प्रेमात अडकली आहे. तिने दोघांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात तिच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचे दिसून येत आहे.
तसेच, रुपालीने कॅप्शन मध्ये “माझं तुझ्यावर प्रेम आहे अंकित” असे देखील लिहिले आहे. तसेच “मी तुझी प्रिन्सेस आहे”, “तू आल्याने मी सुखी झाले”, “शेवटपर्यंत एकत्र राहुयात,” असे देखील टाकले आहे. त्यामुळे यावर संपूर्ण पुष्टी झाली की दोघांनी नक्कीच लग्न केले आहे. रुपाली व अंकित यांना “मर्द मराठी” तर्फे लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.