गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी लग्न, साखरपुडा केल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर या अभिनेत्रीनी आपापल्या प्रेमाला नात्यात बदलले. आता आणखीन एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
मराठी अभिनेत्री सई लोकुर हीचा साखरपुडा झाल्याची माहिती स्वतः सईने फोटो पोस्ट करून सांगितली आहे. सई ने गेल्या काही दिवसांपासून जोडीदाराचा चेहरा लपविलेल्या फोटोज् पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे सईचा जोडीदार कोण हा प्रश्न फॅन्स ना पडला होता. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून अखेर ते गुपित उघड केले आहे.
सई लोकुरच्या जोडीदाराचे नाव तिर्थदीप रॉय आहे. तिर्थदिप एक वरिष्ठ संशोधन अभियंता असून तो बँगलोर येथे कार्यरत आहे. दोघांनीही साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना सेम कॅप्शन टाकले, “माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तेच सर्व गोष्टीची सुरुवात आणि शेवट आहे.”
सईने हिंदी चित्रपट कुछ तुम कहो कुछ हम कहे, किस किसको प्यार करू(कपिल शर्माच्या बायको रोल) मध्ये अभिनय केला आहे. तसेच बिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये देखील दिसून आली. सई लोकूर व तीर्थदिप रॉय या दोघांना मर्द मराठी तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.