गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी लग्न, साखरपुडा केल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर या अभिनेत्रीनी आपापल्या प्रेमाला नात्यात बदलले. आता आणखीन एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेत्री सई लोकुर हीने तिला प्रेमाचा जोडीदार मिळाल्याचे फोटो पोस्ट करून सांगितले आहे. सई ने जरी काही फोटोज् पोस्ट केले असले तरी तिने तीचा जोडीदार कोण आहे, हे मात्र गुपित ठेवले आहे. कारण तिने जोडीदारासोबत पोस्ट केलेल्या दोन्ही फोटोज् मध्ये मुलाची फक्त पाठ दिसत आहे.
सईने गुपित लपविल्याने सईचा जोडीदार नेमके कोण आहे, याबद्दल फॅन्स मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. फोटो पोस्ट करताना सईने असे म्हटले, “गाठी स्वर्गातच बनलेल्या असतात, यावर आता माझा विश्वास बसला आहे. आणि शेवटी मला माझा जोडीदार सापडला आहे.” तसेच पुढे हॅश टॅग वापरत “ईन लव्ह” असे देखील लिहिले.
तसेच, सईचा याबद्दलचा एक व्हिडिओ पुणे टाईम्स नी पोस्ट केला असून त्यात सईने “आणखीन काही वेळ हा सस्पेन्स कायम राहू द्या व लवकरच मी सर्वकाही उघड करेल”, असे म्हटले आहे. सईने हिंदी चित्रपट कुछ तुम कहो कुछ हम कहे, किस किसको प्यार करू(कपिल शर्माच्या बायको रोल) मध्ये दिसून आली. तसेच बिगबॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये देखील दिसून आली.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.