आपल्या दिलखेच अदानी युवापिढीचे आकर्षण ठरणारी हरियाणाची लोकप्रिय डान्सर सध्या एका बातमीमुळे चर्चेत आली आहे. गेले काही महिने शूटिंग पासून दूर राहिलेली या अभिनेत्री बाळाला जन्म दिला आहे. लग्न न होताच तिला बाळ कसे काय झाले असा प्रश्न फॅन्स कडून विचारला जात आहे.
हरियाणा मधील एक डान्सर म्हणून पुढे आलेली सपना ने नंतर बिग बॉस या रियालिटी शो मध्ये सहभाग नोंदविला. नंतर सपनाने अनेक अल्बम केले. परंतु लॉकडाऊन पासून सपना जास्त दिसून येत नव्हती. आता सपना ने एका मुलाला जन्म दिला आहे. सपनाने वीर साहू या अभिनेत्यासोबत विवाह केल्याचे उघड झाले आहे.
जानेवारी 2020 मध्ये सपनाने वीर सोबत विवाह केला होता. वीरच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने दोघांचे लग्न गपचुप करण्यात आले. दोघांनी लग्न व गर्भवती असलेली बातमी मिडीयापासून इतके दिवस लपवून ठेवली होती. परंतु आता स्वतः वीर साहू ने याबाबतीत खुलासा करून फॅन्स ना आश्चर्यचकित केले आहे.
नवीन बाळाच्या आगमनाने सपना व वीर यांच्या परिवारातील सर्व जण खूप आनंदी आहेत. तेरी आंख्या का यो काजल या गाण्यावरील सपनाचा डान्स खूपच गाजला होता व तिथूनच सपना लोकप्रिय झाली. नंतर एखाद्या नेत्याच्या सभेत किंव्हा लग्न समारंभात डान्स करीत सपनाने स्वतःची ओळख बनविली होती.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका