आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात राज्य केलेल्या आणि घराघरा पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना मोठा आजार झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली आहे.  अनेक दशकांपासून सीमा आणि रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमधून रसिकांचं मनोरंजनच नाही तर घरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.सीमा देव या जेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आहेत तर अभिनेता अजिंक्य देव यांच्या त्या मातोश्री आहेत.

seema  deo disease


“माझी आई श्रीमती. सीमा देव अल्झायमरने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत चांगली राहावी याकरता संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीही त्यांच्याकरता प्रार्थना करावी “असं आवाहन अजिंक्य देव यांनी केलं आहे.

१९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.

seema  deo disease

त्यांची तब्येत ठीक होण्यासाठी mardmarathi.com कडून शुभेच्छा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *