सध्या मराठी कलाकारांच्या साखरपुडा व विवाहाच्या बातमी नेहमीच ऐकायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरात नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, तेजपाल वाघ, अर्चना निपाणकर, सई लोकूर या कलाकारांनी आपापले जोडीदार निवडले. आता या यादीमध्ये आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे.
बिग बॉस मराठी या शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्या लग्नाची तारीख ठरली आहे. 21 जून रोजी शर्मिष्ठा हीचा साखरपुडा तेजस देसाई सोबत झाला होता. लॉकडाऊन मध्ये सर्व प्रकारची काळजी घेत दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. आता शर्मिष्ठाच्या हातावर मेहंदी लागली आहे.
सुयश आणि अक्षयाच्या नात्याबद्दल अखेर सुयशने दिले स्पष्टीकरण. “माझं लग्न…
शर्मिष्ठा ने मेहंदीच्या फोटोज् पोस्ट करून फॅन्स ना याबद्दल माहिती दिली आहे. शर्मिष्ठा आणि तेजस यांचा विवाह 11 ऑक्टोबर 2020 रोजी संपन्न होणार आहे. शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न आहे. मेहंदी आणि संगीत मध्ये शर्मिष्ठा तीच्या मित्र परिवारासोबत धमाल करताना दिसून येत आहे. मेहंदीचा एक व्हिडिओ देखील तिने पोस्ट केला आहे.
“फुलले रे क्षण माझे हे गाणे” जोडून शर्मिष्ठा ने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. तसेच साजनजी घर आये या गाण्यावर तर शर्मिष्ठा व तेजस दोघेही धमाल करताना दिसून येत आहेत. दोघांना भावी आयुष्यासाठी “मर्द मराठी” तर्फे खूप खूप शुभेच्छा
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या अभिनेत्रीच्या घरात होणार बाळाचे आगमन
दोघांना तुम्हीही कमेंट मध्ये शुभेच्छा द्या व शेयर करायला विसरू नका