झी मराठीवरील मालिका “लाडाची मी लेक ग” ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या भूमिकेला न्याय देत आहे. आज आपण मालिकेची अभिनेत्री मिताली मयेकर हिच्या होणाऱ्या पती बद्दल जाणून घेऊयात.
मिताली मयेकर “लाडाची मी लेक ग” या मालिकेत कस्तुरीची भूमिका साकारत आहे. मितालीने मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट हिरो सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत रेलेशनशिप मध्ये असून दोघांचा साखरपुडा देखील झाला आहे. दोघांचा साखरपुडा 24 जानेवारी 2019 रोजी झाला होता.
सिद्धार्थ व मितालीची ओळख 24 जानेवारी 2017 ला एका शूटिंग दरम्यान झाली होती. त्यावेळी मिताली ही झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेची शूटिंग करीत होती व सिद्धार्थ झी युवाच्या दुसऱ्या शो मध्ये सहभागी होता. त्यामुळेच दोघांनी साखरपुड्याची तारीख देखील 24 जानेवारी ठरविली होती.

सिद्धार्थ व मिताली ने आजपर्यंत लग्न का केले नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता. खरे तर दोघे यावर्षी लग्न करणार होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मितालीने म्हटले, “लग्न हे सर्वांच्या उपस्थितीत व सर्वांच्या आशीर्वादाने करावयाचा सोहळा आहे. त्यामुळे सद्यपरिस्थिती पाहता आम्ही विवाहसोहळा लांबणीवर टाकला आहे.”
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.