सुशांत सिंग राजपूत या दिवंगत अभिनेत्याच्या मृत्यूला चार महिने होत असली तरीही आणखीन या प्रकरणाचा तपास चालूच आहे. या प्रकरणातून आजपर्यंत अनेक मोठे मोठे खुलासे झाले. सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा अगोदर पासूनच संशय व्यक्त करण्यात येत होता.
आता सुशांतचा कुक नीरज याने त्या संबंधित एक महत्वाची बातमी सांगितली आहे. रिया चक्रवर्ती हिने नवीन नोकर ठेवले होते, याबद्दल बोलताना नीरज म्हणाला, “आमच्यावर रीया मॅडमचे कोणतेच प्रेशर नव्हते. आमच्या साठी सर आणि मॅडम दोन्ही एकसारखेच होते. आमचं काही चुकलं त्यांनी आम्हाला रागावले. परंतु, आमच्यावर कसलाच दबाव टाकला नाही.”

पुढे बोलताना नीरज म्हणाला, “दिशा सलीयान ला आम्ही ओळखत नव्हतो. परंतु मृत्यूच्या काही दिवस अगोदर पासून म्हणजेच दिशाच्या मृत्यू पासून सुशांत ने खूपच जेवण कमी केले होते. परंतु ते नेहमीप्रमाणेच शांत बोलत होते आणि उदास पण वाटत नव्हते. फक्त जेवणच कमी केले होते.”
नीरजनी केलेल्या या महत्वाच्या खुलाशामुळे सुशांत डिप्रेशन मध्ये नव्हता हे मात्र सिद्ध होत आहे. तसेच रिया चक्रवर्ती 13 जून चा रात्री सुशांतला भेटली होती असे एका नेत्याने दावा केल्याने हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआयला या प्रकरणात काही मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका