सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची हत्या नसुन आत्महत्याच होती हे स्पष्ट झाले. परंतु या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन थांबायचे नाव घेत नाही. रीया चक्रवर्ती हिला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर बॉलीवूड मधील अनेक बड्या हस्तींची नावे समोर आली. आता यामध्ये सुशांतच्या बहिणीचे देखील यात कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
रियाला अटक होण्यापूर्वी तिने सुशांतच्या एका बहिणी विरुद्ध तक्रार केली होती. तक्रारी नुसार सुशांतची एक बहीण दिल्लीमधील एका डॉक्टर व सरकारी रुग्णालयाच्या साहाय्याने डूप्लिकेट दिस्क्रीप्शन बनवून सुशांतला ड्रग्स देण्याचे प्रयत्न करीत होती, असा गंभीर आरोप असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले आहे.
यामधील डॉक्टर, दवाखाना व सुशांतची बहीण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे व या गुन्हा देखील सीबीआय मध्ये वर्ग केला आहे. यामुळे सुशांत ला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्याच्या बहिणी समोरच आता मोठे संकट उभे टाकले आहे. जर आरोप सिद्ध झाला तर सुशांत च्या बहिणीला देखील अटक होऊ शकते.
ठाणे येथील शिवसेना पक्षाचे नेते प्रताप सरनाईक सुशांतच्या मृत्यू संबंधी एक अजब शंका उपस्थित केली आहे. सुशांतच्या च कुटुंबांनी प्रॉपर्टी च्या वादातून सुशांतला आत्महत्येस प्रवर्त केले का? असा संशय सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. याबाबतीत त्यांनी पोलिसांना चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकूणच सुशांत मृत्यू प्रकरण हे आता सुशांतच्या कुटुंबावरच येऊन अडकले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका