5 ऑक्टोबर 2016 रोजी झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने नुकतेच चार वर्षे पूर्ण केली. या मालिकेने सुरुवातीपासून ते आजपर्यंत नेहमीच टीआरपीचा उच्चांक गाठला. कारण या मालिकेत वेळोवेळी अनेक मोठे बदल होत गेले.
आताही या मालिकेत नंदिता हे पात्र बदलण्यात आले आहे. त्याच बरोबर “कारभारी लयभारी” ही नवीन मालिका 2 नोव्हेंबर पासून सं. 7.30 वाजता प्रदर्शित होणार असल्याने तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपणार असे फॅन्स ना वाटत होते. परंतु असे न होता मालिकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका आता 2 नोव्हेंबर पासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेत नंदिताचे पुनरागमन झाले असून माधुरी पवार ही अभिनेत्री नंदिताची भूमिका साकारित आहे. त्यामुळे नंदिताचे कटकारस्थाने आता सुरू होतील.
मालिकेचे शूटिंग सुरूच असून त्यामुळे मालिका आणखीन काही महिने मनोरंजन करणार असल्याचे समजते. करागृहातून सुटका होवून परत आलेली नंदिता आता राणा अंजलीच्या नात्यात कडूपणा आणताना दिसणार आहे. तसेच, यापुढे मालिकेत अनेक मोठे बदल होणार असल्याचे देखील समजते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका