गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटी कपल्स नी बाळ होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. विरुष्का, सैफीना, हार्दिक पांड्या- नताशा अशा अनेक सेलिब्रिटींनी फॅन्स सोबत ही बातमी शेयर केली. आता आणखीन एका सेलिब्रिटी कपल्स च्या घरातून गूड न्यूज आली आहे.
भारतीय क्रिकेटमधील माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याची बातमी ऐकण्यात येत आहे. जरी या दोघांनी अधिकृतपणे फॅन्स ना सांगितले नसले तरी ही बातमी बरोबर असल्याचे सूत्राकडून समजते.
सध्या झहीर व सागरिका दोघे यूएई मध्ये आहेत. झहीर हा आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघासोबत असल्याने सागरिकाला त्याने सोबतच नेला आहे. या दोघांनी 23 नोव्हेंबर 2017 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. घरी बाळाचे आगमन होणार असल्याने दोघे खूपच आनंदी असल्याचे समजते.
झहीर खान व सागरिका घाटगे हे दोघेही मूळचे महाराष्ट्रातील आहेत. झहीर हा श्रीरामपूर तर सागरिका ही कोल्हापूरची आहे. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय गोलंदाजीला उच्च स्तरावर नेण्यास जहीरचे मोठे योगदान आहे. तसेच सागरिका ही “चक दे इंडिया” या चित्रपटातून लोकप्रिय झाली होती. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती आवडली तर नक्की शेयर करा व शेयर करायला विसरू नका