2020 या वर्षी बॉलीवूड मध्ये खूप काही घटना घडताना दिसून येत आहेत. बॉलीवूड विश्वाने या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांना गमावल्याचं दु:ख आहे. ऋषि कपूर,सुशांत सिंग राजपूत, इरफान अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांपासून ते निर्मात्यांपर्यंत अनेक नामवंत कलाकार या वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. आता आणखीन एक वाईट बातमी येत आहे.
‘ ये रिश्ता क्या कहलाता है ‘ आणि ‘कुमकुम भाग्य ‘ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या जरीना रोशन या अभिनेत्रीचे निधन झाल्याची वार्ता आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ही अभिनेत्री घराघरात पोहचली होती.
झरीना रोशन यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले असून त्यांनी प्रत्येक पात्राला न्याय दिला होता. कुमकुम भाग्य मलिकेतील त्यांची इंदू दासीची भूमिका विशेष गाजली होती. झरीना यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

जरीना रोशन खान यांना टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. कुंकुम भाग्य मालिकेतील अभिनेत्री श्रीती झा हिने झरीना यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ मध्ये त्या हवा हवाई या गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका