सोशल मीडियावर सेलिब्रिटींना काहीही पोस्ट करताना लोकांना कळेल असे स्पष्ट पोस्ट करावे लागते. कारण कधी कधी सेलिब्रिटींच्या पोस्ट्स चा मोठा गैरसमज करून त्यांना ट्रोल केले जाते. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने एक फोटो पोस्ट केल्याने फॅन्स देखील संभ्रमात पडले आहेत.
अभिषेक बच्चन ने काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची फोटो पोस्ट केली. त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये “हॅप्पी बर्थडे डॅड, मिस यू” असे लिहिले. काही वेळ फॅन्स मध्ये संभ्रम निर्माण झाला. अभिषेक वडील म्हटलेला हा व्यक्ती नेमके कोण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता त्याबाबतीत सत्य समोर आले आहे.
वरील फोटोमधील व्यक्ती ही ऐश्वर्या राय हिचे वडील आहेत. त्यांचे नाव कृष्णराज राय हे आहे. ऐश्वर्याच्या वडिलाचे मार्च 2017 रोजी आजारपणामुळे निधन झाले होते. त्यावर्षी बच्चन कुटुंबियांनी दिवाळी देखील साजरी केली नव्हती. वडीलांच्या जन्मदिवशी ऐश्वर्या राय हीने देखील पोस्ट केली आहे.
सर्वांनाच माहिती आहे की अभिषेक ऐश्वर्यावर व आणि तिच्या कुटुंबावर खूपच प्रेम करतो. त्यामुळे अभिषेक ने सासऱ्याच्या जन्म दिवशी पोस्ट करून अभिवादन केले. त्याने कॅपशन स्पष्ट लिहिले नसल्याने थोडा वेळेसाठी फॅन्स विचारात पडले होते, हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका