काही वर्षापूर्वी टेलिव्हिजन वर लोकप्रिय झालेली लागिर झालं जी मालिकेला महाराष्ट्रभरातून प्रेम मिळाले. या मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांना आठवितात. मालिकेची लोकप्रिय जोडी अजिंक्य आणि शीतल यांना प्रेक्षकांनी खूपच पसंद केले होते. आता याच जोडीच्या फॅन्स साठी आनंदाची बातमी आहे.
लागिर झालं जी मालिकेत अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण ने तर शीतल ची भूमिका शिवानी बावकर यांनी केली होती. आता नितीश आणि शिवानी हे परत एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. दोघांनीही याबद्दल त्यांच्या फॅन्सना माहिती दिली आहे.
अज्या शितलीच्या प्रेमाची झलक आता एका नवीन गाण्यातून दिसणार आहे. “चाहूल” नावाचे हे गाणे असून हे एक प्रेमाचे गाणे आहेत. हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून हे गाणे ओमकार माने यांनी दिग्दर्शित केले आहे. तर या गाण्याला विजय भाटे यांनी गायले आहे.
लागिर झालं जी मालिकेतील जसे दोघांच्या प्रेमाला लोकांनी पसंद केले तसेच या गाण्याला पण लोक पसंद करतील अशी अपेक्षा आहे. खरे तर या दोघांचे यापूर्वीही खुळाच झालो ग हे गाणे प्रदर्शित झाले होते व ते लोकांना खूप आवडले देखील होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका