काही दिवसांपूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर कोरोनाचे संकट उभा राहिले होते. सेटवरील तब्बल 22 जणांना कोरोनाची बाधा झाली होती व त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले होते. आता या मालिकेसंबंधी मोठी बातमी आली आहे. मुख्य अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिला मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे.
अलका कुबल यांनी राजश्री मराठीशी बोलताना प्राजक्ता गायकवाड या अभिनेत्रीवर ताशेरे ओढले आहेत. “प्राजक्ताला जराही लाज नाही, तिने अभिनय क्षेत्र निवडले आहे तर त्याचा तीने आदर करायला हवा. सेटवर नेहमीच हिचे नखरे चालायचे. मोठ्या मोठ्याने रडायची, हिचे मध्येच डोकं दुखायचे.” असा आरोप अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड वर लावला आहे.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “प्राजक्ताचे वागणे पाहून मला शरद पोंक्षे, प्राजक्ता दिघे यांनी म्हटले, की अलका तू हिला काढून टाक. 22 वर्षाची लहान आहे म्हणून चुका सांभाळून घेतल्या. पण नंतर विचार केला मी पण 16 वर्षी अभिनयाला सुरुवात केली, परंतु मी कधी असे वागले नव्हते. सर्वात महत्त्वाचे ती 6 तास रूम मधून बाहेर शूटिंग साठी येत नव्हती.”
“सेटवरील सर्वजण हीची वाट पाहत असे. आशालता इतके वयोवृद्ध असून देखील सेट हीची वाट पाहत होत्या. हिला जराही लाज नाही. नंतर रूम मधून बाहेर आल्यास तिला त्याचा जराही पश्चाताप वाटत नव्हता. माझं डोकं दुखतंय मला काढून टाका, मी घरी जातेय, असे बेजबाबदार पणे ती बोलायची. म्हणून आम्हाला तिला मालिकेतून काढावे लागले” असे अलका कुबल म्हणाल्या.
पुढे अलका कुबल यांनी प्राजक्ताच्या आईबद्दल देखील संताप व्यक्त केला. “प्राजक्ताच्या आईचा प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप असायचा. सेटवरील प्रत्येकाना ती बाई दम द्यायची. माझ्या 35 वर्षाच्या करीयर मध्ये अभिनेत्रीची अशी आई कधीच पाहिली नाही.” प्राजक्ताने याबद्दल आणखीन काहीच बोलले नाही. तरी मालिकेत आता वीणा जगताप ही अभिनेत्री ते पात्र साकारणार आहे.