सध्या मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात नवा वाद सुरू झालेला पाहायला मिळत आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “आई माझी काळूबाई” या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिला मालिकेतून काढल्याचे म्हटले होते. त्याच मुलाखतीत अलका कुबल यांनी एक वादग्रस्त विधान देखील केले होते.

मालिकेत हा मोठा बदल झाल्यानंतर अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच, प्राजक्ताने अगोदर काम केलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिके बद्दल बोलताना “संभाजी” असा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर अलका कुबल यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली होती.
त्या संदर्भात अलका कुबल यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. अलका कुबल म्हणाल्या, “मालिकेचा जो वाद चालू होता, त्याबद्दल बोलताना मी आदरणीय स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांबद्दल डायरेक्ट संभाजी असा उल्लेख केला. खरे तर शिव छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. अनवधानाने घडलेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.”
तसेच आज प्राजक्ता गायकवाड हीने पत्रकार परिषद घेऊन काही आरोप फेटाळून लावले आहेत. अलका ताईंनी माझ्यावर आणि माझ्या आईवर चुकीचे आरोप लावले असल्याचे देखील प्राजक्ता ने म्हटले आहे. तसेच, अभिनेता विवेक सांगळे याने तिला शिवीगाळ केल्याचा आरोप देखील प्राजक्ताने लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका