2020 या वर्षाला संपायला फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. परंतु या वर्षभरात एकीकडे कोरोना या रोगाने मृत्यूचे तांडव मांडले तर दुसरीकडे अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाल्याचे ऐकायला मिळाले. यातच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाने एकच खळबळ माजली होती.

सुशांत च्या मृत्यूनंतर त्याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे हीला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी काही दिवस अंकिता सोशल मीडियावर दिसली देखील नव्हती. नंतर अंकिता मीडियासमोर येऊन सुशांतच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली होती. परंतु पोलिसांनी व सीबीआयने सुशांत ने आत्महत्याच केल्याचे घोषित केल्यानंतर अंकिता तीचे सामान्य जीवन जगू लागली.
काही दिवसापूर्वी अंकिताने तिचा होणारा नवरा विक्की जैन याच्यासोबत एक डान्स व्हिडिओ शेयर केला होता. त्यामुळे तिला सुशांत फॅन्स नी ट्रोल केले होते. अनेकांनी म्हटले होते की अंकिताने सुशांतला सहजरीत्या विसरले. परंतु आता अंकिताने “तारों के शहर मे” या गाण्यावरील एक डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अंकिताने हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅपशन मध्ये असे लिहिले, “यावेळी हा डान्स वेगळा आणि थोडा अवघड वाटत आहे. हे खूप त्रासदायक आहे.” तसेच, अंकिताने हॅशटॅग मध्ये सुशांतचे नाव टाकत त्याला हा डान्स समर्पित केला आहे. या डान्स वर अनेकांनी सुशांत सोबत असायला हवा अशी खंत व्यक्त केली. एका फॅन ने तर म्हटला, यावेळी “तू सुशांत सोबत डान्स करताना पाहायला आवडले असते.”
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.