झी मराठी वाहिनीवर आज दिनांक 2 नोव्हेंबर पासून कारभारी लयभारी ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. या मालिकेत राजकारण व प्रेम हे दोन्ही पाहायला मिळेल. मालिकेतील अनेक कलाकार नवखे असून त्यातील काहींनी यापूर्वीही काही मालिकांमध्ये काम केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दाखविण्यात येणाऱ्या कारभारी लयभारी मालिकेच्या प्रोमो मध्ये अभिनेता निखिल चव्हाण व अभिनेत्री अनुष्का सरकटे हे मुख्य भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. निखिलला आपण यापूर्वी लागिर झालं जी मालिकेत पाहिले आहेच, परंतु अनुष्का देखील यापूर्वी काही मालिकेत दिसून आली आहे. आज आपण तिच्याबद्दल जाणून घेऊयात.
अनुष्का सरकटे हीचा जन्म 7 नोव्हेंबर 1994 रोजी झाला होता. ती मूळची औरंगाबाद येथील आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. नंतर तिने अभिनयातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई इथे राहिली व नंतर तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
अनुष्का हीने कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका “श्री लक्ष्मीनारायण” मध्ये खऱ्या अर्थाने अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेत तिने लक्ष्मीदेवीची मुख्य भूमिका साकारली होती. आता कारभारी लयभारी मालिकेत राजवीर सुर्यवंशीच्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसेल. अनुष्का व मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.