लग्न करताना कायम एकमेकांच्या सोबत राहु अशी शपथ घेऊनच नवरा बायको संसाराची सुरुवात करतात. दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्यभर एकत्र राहण्याचे ठरवितात. परंतु जर दोघांपैकी एकाचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्या विश्वासाला तडा जातो व कधी कधी तर यामुळे अनेकांचे संसारही उध्वस्त होतात.

Bhopal marriage news


नवऱ्या बायकोच्या नात्यात जर एखादी तिसरी व्यक्ती आली तर दोघात भांडण होणे साहजिकच आहे. अशा संबंधामुळे अनेक गुन्हे घडलेले आपण ऐकले आहेत. परंतु आता एक अशी घटना घडलेली ऐकायला मिळत आहे, ज्या घटनेमुळे पत्नीचे चक्क कौतुक करण्यात येत आहे.

Bhopal marriage news

ही घटना भोपाळ येथे घडली आहे. एका जोडीचे 3 वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर नवऱ्याचे एका मुलीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले होते. ही गोष्ट ज्यावेळी बायकोला कळाली तेंव्हा बायकोने नवऱ्याला जाब विचारला. त्यावेळी नवऱ्याने दोघी सोबत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.


कायद्याने विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा असल्याने नवऱ्याला ते शक्य नव्हते. परंतु, या प्रकरणात त्या व्यक्तीच्या पत्नीनेच पुढाकार घेऊन तिच्या पतीचे प्रेयसीसोबत लग्न लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरे तर या संबंधी पत्नी पोलिसात तक्रार देखील दाखल करू शकली असती. परंतु तिने त्या दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतल्याने पत्नीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *