गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी होणाऱ्या बाळासंदर्भात आनंदाच्या बातमी दिल्या आहेत. त्यात अनुष्का शर्मा, करीना कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. परंतु आता एका बॉलिवुड अभिनेत्रींने तिच्या एका बाळाचा मृत्यू झाल्याचा मोठा खुलासा केला आहे.


आपल्या मादक अदानी काही काळ बॉलिवुड गाजविणारी अभिनेत्री सेलिना जेटली हीने बाळाचा मृत्यू झाल्याचे उघड केले आहे. सेलिनाचे लग्न 2011 मध्ये पीटर हॅग याच्यासोबत झाला होता. सेलिनाला 2012 मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यावेळी जन्मलेली दोन्ही मुली ठणठणीत होती.
सेलिनाची 2018 मध्ये दुसऱ्यांदा प्रसूती झाली. योगायोग म्हणजे यावेळी देखील सेलिना ने जुळ्या बाळांना जन्म दिला. पण यावेळी तिच्या आयुष्यात दुःखद घटना घडली. यावेळी देखील 2 मुलेच झाली व दोन्हीपैकी एका बाळाचा मृत्यू झाला व दुसऱ्या बाळाला डॉक्टरांनी अथक प्रयत्नांमुळे वाचवू शकले.
सेलिनाला या निराशेतून सावरायला खूप वेळ लागला. बाळाचा अकाली जन्म दिवसा निमित्ताने सेलेनाने पोस्ट करीत याबद्दल खुलासा केला. तारखेच्या अगोदर बाळाचा जन्म होणे हे खूप धोकादायक असते, असे देखील तिने सांगितले आहे. तसेच, त्यातून वाचलेल्या बाळासाठी ती खूपच समाधानी असल्याचे तिने पोस्ट करून म्हटले.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका