गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये हिंदी सेलेब्रिटी सोबतच काही मराठी सेलिब्रिटीच्या घरी देखील नवीन पाहुणा येणार आहे. यामध्ये टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकर हीचा देखील समावेश आहे.
“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतून निरोप घेत धनश्री काडगावकर हीने फॅन्सना आनंदाची बातमी दिली. लवकरच धनश्री एका बाळाची आई होणार आहे. मागे तिने गरोदर पणाच्या फोटोज् व व्हिडिओ देखील पोस्ट केले होते. आता धनश्रीच्या डोहाळे जेवणाचे व्हिडिओज व फोटोज् व्हायरल झाले आहेत.
धनश्री डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात खूपच सुंदर दिसत होती. तिने कार्यक्रमात काटा पदराची साडी घातली होती, तर तिचा पती धूर्वेश देशमुख याने कुर्ता पायजमा घातला होता. या कार्यक्रमासाठी सिद्धी पाटील यांनी बनवलेली ज्वेलरी मध्ये ती आणखीनच सुंदर दिसत होती.
धनश्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी पार पडला असून या कार्यक्रमाला मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. येणाऱ्या काही दिवसात देशमुखांच्या घरी छोट्या बाळाचे आगमन होणार आहे. कार्यक्रमातील काही फोटोज् व व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका