महाराष्ट्रात सध्या डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येने एकच खळबळ माजली आहे. शीतल आमटे या आयुष्यभर समाजसेवा करणारे, महारोग्याना मदतीचा हाथ पुढे करणारे डॉ. बाबा आमटे यांच्या नात होय. तसेच, त्या विकास आमटे यांची कन्या होत्या. अशा थोर परिवारातील व्यक्तीने आत्महत्या केल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
शीतल आमटे या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. आज त्यांनी विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केली. नंतर त्यांना वरोरा येथील रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. परंतु शीतल यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विट वरून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
शीतल आमटे यांनी आजच दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 5.45 मिनिटाला एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी ॲक्रीलीक कॅनव्हास ची एक पेंटिंग पोस्ट केली आहे. त्यावर फोटोच्या वरी त्यांनी “वार अँड पीस” म्हणजेच “युद्ध आणि शांतता” असे लिहिले आहे. यावरून त्यांना मागील काही दिवसात नक्कीच कोणत्या तरी समस्यांचा सामना करावा लागत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
'War and Peace'#acrylic on canvas.
30 inches x 30 inches. pic.twitter.com/yxfFhuv89z— Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal) November 30, 2020
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार आमटे परिवारात मागील काही दिवसांपासून आंतर्गत वाद विवाद सुरू असल्याचे समजते. परंतु त्यांचा घरगुती वाद जास्तच चिघळला होता व तो समोर देखील होता. असे ऐकण्यात येत आहे की शीतल या त्या वादाच्या केंद्रस्थानी होत्या. या कारणानेच त्यांनी तशी पोस्ट करीत आत्महत्या केली असावी.
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.