झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका लागिर झालं जी सर्वांना आजही आवडते. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. परंतु त्या मालिकेच्या फॅन्ससाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे.
लागिर झालं जी मालिकेत अजिंक्य शिंदेच्या(नितीश चव्हाण) आज्जीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे दुःखद निधन झाले आहे. मालिकेत त्यांनी जीजीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. अजिंक्य व शीतल त्यांचा खूप जीव असल्याचे दाखविण्यात आले होते.
वयाची 80 गाठलेली असताना देखील कमल ठोके यांची जीजीची अजरामर भूमिका लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गेल्या काही महिन्यांपासून जीजी या कर्करोगानी ग्रासल्या होत्या. त्या त्यांच्या मुलाकडे राहून बंगळूर येथे उपचार घेत होत्या.
फेसबुकवर युवा पिढीसारखे सतत अपडेट राहणाऱ्या जीजी मालिकेच्या सेटवर सर्वांच्या आवडत्या होत्या. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री शिवानी बावकरने एक पोस्ट करताना “जिजे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील” अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.
कमल ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जास्तीत जास्त शेयर करा