एखाद्या व्यक्तीचे भविष्य चमकायला एक रात्र पुरेशी असते. “कौन बनेगा करोडपती” या टीव्ही शो मधील स्पर्धकाबाबतीत देखील असेच काहीतरी असते. सध्या एक महिला स्पर्धक 1 करोड रुपये जिंकल्याचे प्रोमो मध्ये दाखविण्यात आले आहे. ती महिला नक्की कोण आहे हे जाणून घेतल्यास तुम्हीही तिची प्रशंसा कराल.

Kbc mohita sharma


प्रोमोमध्ये दिसणारी महिला मोहीता शर्मा आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की मोहिता या एक आयपीएस अधिकारी (इंडियन पोलीस सर्व्हिस) आहे. मोहिता शर्मा या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या असून त्यांनी दिल्ली येथे अभ्यास केला होता. त्या 2017 वर्षातील बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महत्वाचे म्हणजे मोहिता शर्मा या जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहेत.

Kbc mohita sharma


मोहिता शर्मा यांचे पती हे देखील साधारण व्यक्ती नाहीत. त्यांच्या पतीचे नाव रूशल गर्ग असून ते देखील मोठे अधिकारी आहेत. रूशल हे आयएफएस अधिकारी (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) आहेत. दोघांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. मोहिता आयपीएस अधिकारी असल्याने साहजिकच त्यांच्याकडे सामान्य माहितीचा भंडार असेलच.

Kbc mohita sharma

 

स्वतःमधील ज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत मोहिता कौन बनेगा करोडपती मध्ये पोहचल्या व त्यांनी 1 करोडचा पल्ला देखील गाठला. एका प्रोमो मध्ये अमिताभ बच्चन यांनी मोहिताला 7 करोडचा प्रश्न विचारलेले दाखविण्यात आले आहे. आता मोहिता 7 करोड रुपये जिंकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.