बॉलीवूड क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ कलाकारांची मुले अभिनय क्षेत्रात नाव कमवीत आहेत. तसेच, काही कलाकारांची मुळे अभिनयापासून दूर राहतात. अभिनयापासून दूर राहून देखील काही कलाकारांची मुले सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. यातच एक नाव म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ.
आपल्या अभिनयाने गेल्या 2-3 दशकापासून नाव कमविलेल्या जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ बद्दल सर्वांनाच माहिती आहे. टायगरचे नाव सध्या आघाडीच्या अभिनेत्यामध्ये घेतले जाते. परंतु टायगरची बहिण देखील कमी लोकप्रिय नाही. तिच्या बोल्ड फोटोज् मुळे ती नेहमीच चर्चेत असते.
कृष्णा श्रॉफ ही एक ट्रेनर सेंटरची मालकीण असून त्या सेंटरचे नाव एमएमए मॅट्रिक्स आहे. हे सेंटर 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाले होते. खरे तर कृष्णाची देखील पिळदार शरीरयष्टी आहे. तिच्या बॉडी आणि बोल्ड लुक पुढे अनेक बॉलिवुड अभिनेत्री फिक्या आहेत.
कृष्णाचे नुकतेच तिच्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाले आहे. यामुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे. तिच्या मादक शरीरामुळे ती युवा पिढीचे आकर्षण ठरत असते. वडील जॅकी श्रॉफ आणि भाऊ टायगर श्रॉफ सारखे ती जरी अभिनय क्षेत्रात नाव कमवू शकली नसली तरी तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.