मराठी टेलिव्हिजन वरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजेच “लागिर झालं जी” ही मालिका होय. 2-3 वर्षांपूर्वी या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांना त्यांच्या मालिकेतील नावाने ओळखतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजेच “साया काशीद” ही होय.
मालिकेच्या मध्यावधीत साया ने पूजा नामक एक पात्र साकारले होते. त्यात तिने विक्याच्या प्रेयसीचे पात्र साकारले होते. त्यावेळी तिच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र झाली होती. सायाच्या खऱ्या आयुष्यातील या फोटो पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही, की ही तीच पूजा आहे.
साया काशीद ही मूळची सातारा शहरातील आहे. तिचा जन्म 28 जून 1994 रोजी साताऱ्यातच झाला. सायाने तिच्या अभिनयाची सुरुवात 2016 पासून केली. सोंदर्याची खाण असलेल्या या अभिनेत्रीला खरी लोकप्रियता “लागिर झालं जी” या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेनंतर सायाला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
सायाचे बाज्या, दान, ऑनलाईन मिस्टेक असे काही मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तसेच, तिने “हू तारा इश्क मा” या गुजराती चित्रपटात देखील उत्तम भूमिका साकारली आहे. तिच्या मॉडर्न लुक मधील फोटोज् ने युवा पिढीला वेढ लावले आहे. सायाने लक्ष्मी नारायण या मराठी मालिकेत तर, दूर किनारे मिलते है या हिंदी मालिकेत उत्तम अभिनय केला आहे.
सायाचा अभिनय, लुक पाहता तीचे भविष्य खूप उज्वल आहे असेच दिसते. साया काशीदला भावी आयुष्यासाठी व तिच्या करिअर साठी खूप खूप शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.