काही कलाकार आपल्या अभिनयाची अशी काही जादू दाखवितात की ते कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून राहतात. अशा कलाकारांची किंव्हा त्यांच्या एखाद्या भूमिकेची कायम चर्चा केली जाते. असाच एक अभिनेता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, ते नाव म्हणजेच अभिनेता शरद केळकर.
शरद केळकर हे नाव अभिनय क्षेत्रात काही नवीन नाही आहे. रामलीला, तान्हाजी – द अनसंग वारियर अशा चित्रपटातील भूमिकेने शरद केळकर याने अगोदरच नाव कमविले होते होते. परंतु आता “लक्ष्मी” या नवीन चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सर्वांना वेड लावले आहे. अक्षय कुमार सारखा दिग्गज अभिनेता चित्रपटात असताना देखील शरद केळकरचीच जास्त चर्चा होताना दिसून येत आहे.
शरद केळकर याने लक्ष्मी चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारली असून, लक्ष्मी हे एका तृतीयपंथीचे पात्र दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे लक्ष्मी बॉम्ब हे नाव रद्द करून लक्ष्मी हे ठेवण्यात आले होते. तृतीयपंथी सोबत राहून त्यांचे दुःख समजून घेऊन शरद ने लक्ष्मी हे पात्र साकारत तृतीयपंथीयांच्या वेदना उत्तमरित्या मांडल्या आहेत.
सध्या चर्चेत असलेल्या अभिनेता शरद केळकरची बायको आहे ही लोकप्रिय अभिनेत्री
कांचाना या साउथच्या चित्रपटाचा लक्ष्मी हा चित्रपट रिमेक केला आहे. तान्हाजी चित्रपटातील शिवरायांचे हुबेहूब पात्र साकारून शरद ने अनेकांची मने जिंकली होती. आता लक्ष्मी चित्रपटातील त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व त्याचे कौतुक पण केले जात आहे.
पाहा व्हिडिओ
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.