जगात सगळीकडे रंग, शरीरयष्टी, जात, गरिबी या गोष्टीवरून नेहमीच भेदभाव झालेला दिसून येत असतो. परंतु, यासर्व गोष्टी काहींना जन्मतः मिळत असतात. त्यामुळे त्याचा सामना करीत अनेकजण पुढे जात असतात. असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता महेश जाधव.

सोशल मीडियावर सध्या महेश जाधवची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. झी मराठीवरील नवीन मालिका “कारभारी लयभारी” या मालिकेत महेश हा जगदीश पाटील ही भूमिका साकारताना दिसून येत आहे. त्याच संदर्भात बोलताना एक सुंदर पोस्ट केली. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याची उंची कमी असून देखील यश प्राप्त करीत असल्याचे सांगितले.
महेश म्हणाला, “माझ्या किंव्हा माझ्यासारख्या लोकांकडे जन्मापासून विनोदी पद्धतीनेच बघितले जाते. हे लोक जास्त तर विनोदी भूमिका किंव्हा सर्कस मध्ये जोकरचं काम करतात. पण त्याच जोकरचं महत्त्व पत्त्यात जास्त असते, ज्याच्याकडे तो पत्ता असतो तो कुठल्याही पानाला लावून विजयी होतो. तुम्ही या अगोदर पाहिलेला टॅलेंट आणि आत्ताचा जगदीश हे फक्त तेजपाल वाघ यांच्या लेखणीच्या प्रेमामुळे तुम्हाला पाहायला मिळाला.”
अशी पोस्ट करून महेश जाधव ने अनेक फॅन्स चे मन जिंकले आहे. त्याने दाखवून दिले की उंचीने कमी असून देखील त्याने खचून न जाता आल्या अभिनयातून सर्वांची मने जिंकत आहे. कारभारी लयभारी मालिकेत तो एका खलनायकच्या भूमिकेत दिसून येणारं आहे. सदैव माझ्यावर असेच प्रेम ठेवा असे महेश ने विनंती देखील केली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.