गेल्या काही महिन्यापासून काही मराठी कलाकारांचा साखरपुडा तर काहींचे लग्न झाल्याचे दिसून आले. यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपानकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड, अभिज्ञा भावे यांचा समावेश होता. आता या यादीत आता आणखीन एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
आपल्या दिलखेच अदांनी तरुण पिढीला घायाळ करणारी मराठी अभिनेत्री मानसी नाईक हीचा आज साखरपुडा झाला आहे. प्रदीप खरेरा या प्रोफेशनल बॉक्सर सोबत मानसीचा साखरपुडा झाला आहे. ऐकण्यात येत आहे की हा साखरपुडा फक्त 6 लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यात मानसीचे आई वडील आणि मानसीची मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा समावेश होता.
साखरपुड्याला मानसीने केशरी व हिरव्या रंगाची साडी घातली होती तर प्रदीप ने पायजमा कुर्ता घातला होता. दोघेही या पेहरावात खूपच सुंदर दिसत होते. प्रदीप हा हरियाणाचा असल्याने त्याचे नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु सर्व नातेवाईकांना व्हिडिओ कॉल द्वारे हा कार्यक्रम दाखविण्यात आला.
या कार्यक्रमाला मानसीची जवळची मैत्रीण दिपाली भोसले – सय्यद हीची उपस्थिती होती. “मोठी बहीण कशी असावी तर ती अगदी तुझ्यासारखी असावी” अशा शब्दात मानसीने दिपालीच्या पोस्ट वर कमेंट करून उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. तसेच दिपालीने कार्यक्रमात शूट केलेला डान्सचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
मानसी नाईक व प्रदीप खरेरा दोघांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हीही कमेंट मध्ये दोघांना शुभेच्या द्या व शेयर करायला विसरू नका.