सिनेसृष्टीमध्ये सध्या कलाकारांच्या साखरपुडा व लगीनसराईच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अनेक हिंदी व मराठी कलाकार गेल्या वर्षभरात प्रेम बंधनात अडकल्याचे ऐकायला मिळाले. आता मराठी अभिनय क्षेत्रातील 2 अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघींनी स्वतः पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
यामध्ये पहिली अभिनेत्री आहे मिताली मयेकर. सर्वांनाच माहिती आहे मितालीचा साखरपुडा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत झाला आहे. दोघांचा साखरपुडा 24 जानेवारी 2019 रोजी झाला होता. खरे तर दोघे याच वर्षी लग्न बंधनात अडकणार होते. परंतु कोरोना मुळे त्यांनी लग्नसोहळा पुढे ढकलला.
मितालीने सिद्धार्थ सोबतचा एक फोटो पोस्ट करताना पुढील दिवाळीच्या अगोदर दोघे जण लग्न करणार असल्याचे सांगितले. सध्या मिताली झी मराठीवरील “लाडाची मी लेक ग” या मालिकेत दिसून येत आहे. मिताली सोबतच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील येत्या वर्षभरात विवाह बंधनात अडकणार आहे.
अभिज्ञा भावे या अभिनेत्रीने काही दिवसापूर्वी मेहुल पै या व्यक्तीसोबत रिलेशन मध्ये असल्याचे उघड केले होते. नंतर या अभिनेत्री काही दिवसानंतर साखरपुडा देखील उरकला होता. अभिज्ञाने देखील मेहुल सोबत एक पोस्ट करताना पुढच्या पाडव्याची वाट पाहतेय असे सांगितले. यावरूनच ते दोघे देखील लवकरच लग्न करणार आहेत असे दिसून येते.
अभिज्ञाने मेहुल सोबतचा एक फोटो शेयर करीत ही बातमी दिली आहे. दोघेही काळ्या रंगाच्या पेहरावात खूपच सुंदर दिसत होते. अभिज्ञा सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत भूमिका करताना दिसून येत आहे. या दोन्ही जोडीना मर्द मराठी तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.