काही महिन्यांपूर्वी अभिनय क्षेत्रात 2 दुःखद घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. एकीकडे बॉलिवुडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केलेली बातमी ऐकायला मिळाली तर दुसरीकडे मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली.
आशुतोष भाकरे या अभिनेत्याची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही आहे. या घटनेमुळे काळाने मयुरीवर मोठा आघात केला होता. मयुरीला या दुःखातून सावरत अभिनयाची सुरुवात केली आहे. आता मयुरी परत एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. यावेळी मयुरी एका मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.
पतीच्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर मयुरी देशमुख ही आता स्टार प्लस वाहिनीवरील इमली या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत मयुरीसोबत मराठी अभिनेता गश्मीर महाजनी झळकणार असून ही लवकरच ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ही मालिका एक रहस्यमय असणार आहे, असेच ट्रेलर मधून दिसत आहे.
येणाऱ्या मालिकेबद्दल बोलताना मयुरीने पोस्ट द्वारे म्हटले, “तुम्ही मला व माझ्या कुटुंबाला दिलेल्या सुंदर प्रार्थनासाठी मी खूप कृतज्ञ आहे. तुमच्या याच प्रेमामुळेच मी आता नवीन पाऊल टाकत आहे. तुमच्या आशीर्वादाची मला आणखीन गरज आहे.” मराठी प्रमाणेच आता हिंदी मालिकेत देखील मयुरी आता आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडण्यास सज्ज आहे.

मयुरीला “इमली” मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.