80 च्या दशकापासून ते आजपर्यंत बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळविणारा अभिनेता मिथुन चक्रवर्ती हा अभिनेता सर्वांनाच माहिती आहे. खासकरून 80 व 90च्या दशकात मिथुन चक्रवर्ती हा युवा पिढीचा आवडता अभिनेता होता. आज आपण याच मिथुनच्या सूनेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या सौंदर्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मिथुनला तीन मुले व एक मुलगी असून त्या पैकी महाक्षय(मिमोह) याने देखील बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला तितके जास्त यश मिळाले नाही. मिमोह याने 2 वर्षापूर्वी म्हणजेच 2018 मध्ये मदालसा शर्मा या अभिनेत्री सोबत लग्न केले होते. मदालसा हीने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ अशा अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे.
मदालीसा ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते. तिच्या फोटोज् व्हिडिओज ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. तिचे सौंदर्य पाहता बॉलिवुडच्या अनेक अभिनेत्री तिच्यासमोर फिक्या दिसतात. तिने 2009 फिटिंग या चित्रपटातून पदार्पण केले होते. नंतर तिने शौर्य या गाजलेल्या कन्नड चित्रपटातून पण काम केले आहे.
मदालसा हीने अनेक मोठ्या साऊथच्या अभिनेत्यासोबत काम केले आहे. परंतु त्या मानाने मिमोह ने फारसे यश प्राप्त केले नाही. मिमोह याने “हंटेड 3D” “द मर्डरर”, रॉकी अशा काही चित्रपटात अभिनेता म्हणून दिसून आला होता. परंतु एकीकडे मदालसाने अनेक हिट चित्रपटात काम केले.