बॉलीवूडमधील आजच्या युगातील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर तिच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची गाणी लहान मुले व युवा पिढीच्या मुखात कायम असतात. गेल्या महिन्यात 24 ऑक्टोबरला नेहाचे लग्न झाल्याने सोशल मीडियावर फक्त तिच्या लग्नाच्याच फोटो आणि व्हिडिओचीच चर्चा होती.
रोहनप्रीत सिंग या गायकासोबत लग्न केल्यानंतर नेहाची गेल्या 1 महिन्यात तिच्या हनिमून मुळे चर्चा होती. दोघे हनिमूनला कुठे गेले, दोघांनी हनिमूनसाठी बुक केलेल्या हॉटेल रूमची किंमत किती होती? अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. आता नेहा व रोहनप्रीत यांचा हनिमूनचा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
नेहा व रोहनप्रीत यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाल्या कारणाने दोघांनी एकमेकांना शुभेच्छाच्या पोस्ट केल्या आहेत. नेहाने तर शुभेच्छा देण्यासाठी दोघांचा हनिमून मधील स्पेशल व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दोघांनी लग्नानंतर काय काय केले ते दाखविण्यात आले आहे. काही क्षणातच हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
नेहाने रोहनप्रीतला शुभेच्छा देताना असे म्हटले, “मी अपेक्षाही केली नव्हती इतके प्रेम मला तुझ्याकडून व तुझ्या परिवाराकडून मिळाले आहे. खूप आनंदी आहे.” दुबई मधील एका आलिशान हॉटेल मध्ये दोघांनी हनिमून साजरा केला. आता नेहा परत एकदा शूटिंग मध्ये व्यस्त झाली असून ती लवकरच इंडियन आयडॉल या शो मध्ये दिसणार आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.