सोशल मीडियावर कलाकारांना थोडेसे जपूनच फोटो व्हिडिओज पोस्ट करावे लागतात. कारण एखाद्या कलाकाराने फोटोमध्ये काहीही लपवायला पाहिलं तरी फॅन्स काहीतरी शोधूनच काढत असतात. पण कधी कधी तर काही फोटोंचा वेगळाच अर्थ काढला जातो.
बॉलिवुडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हीचा नुकताच रोहनप्रीत सिंग या पंजाबी गायकासोबत विवाह झाला. नेहाच्या लग्नसमारंभातील अनेक फोटोज् आपण पाहिले असतील. परंतु नेहाच्या लग्न समारंभातील एका फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्या फोटोत नेहाच्या मांडीवर एक लहान बाळ दिसून येत आहे.
नेतकऱ्यानी या फोटोबद्दल अनेक तर्क वितर्क लावले. कोणी म्हटले हे बाळ नेहा व रोहनप्रीत यांचे बाळ आहे. काहींनी म्हटले की या बाळा मुळेच दोघांनी लवकर लग्न केले. परंतु हे बाळ या दोघांचे नसून त्यांच्या एका नातेवाईकाचे आहे. जे या फोटो मध्ये दोघांच्या साइडला उभे राहिलेले दिसत आहेत.

नेहाचे लग्न जरी धूमधडाक्यात झाले असले तरी या फोटोमुळे तिला काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सत्य समोर आल्याने सर्वकाही स्पष्ट झाले आहे. नेहाच्या लग्नाच्या व अन्य कार्यक्रमाच्या अनेक सुंदर फोटोज् सर्वत्र दिसून येत होते. दोघे नवीन जोडी एकमेकांसोबत खूप खुश दिसून येत होती.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.