गेल्या काही दिवसांपासून एक लग्नाच्या फोटोज् सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्या मध्ये एक वयोवृद्ध माणूस आणि एक वयाने कमी दिसत असलेल्या मुलीचा विवाह झालेल्या फोटोज् दिसत आहेत. मुलीने कसे काय आजोबांच्या वयाच्या व्यक्ती सोबत लग्न केले असा प्रश्न सर्वांना पडला होता.
वरील फोटोला घेऊन सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडविली, काहींनी त्या अजोबाचे नशीब म्हटले तर काही त्या मुलीचे नशीब फुटके असे म्हटले. परंतु या लग्नामागील सत्य काही तरी वेगळेच आहे. फोटोमधील नवरदेव हे 66 वर्षाचे असून नवरी ही 45 वर्षाची आहे. दोघांनीही लग्न फक्त त्यांच्या काही मजबुरीसाठीच केले.
मुंबईच्या उरण तालुक्यातील बामणडोंगरी या गावात ते आजोबा राहत असून त्यांचे नाव माधव पाटील आहे. 30 वर्षाचे असताना त्यांचा एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता. परंतु, त्यावेळी त्यांचे होणारे लग्न मोडण्यात आले होते. तेंव्हा माधव यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊन मध्ये त्यांना सोबतीला कोणीतरी असायला हवे अशी खंत वाटतं होती.
स्वतःला व 88 वर्षीय आईला आधार मिळावा यासाठी माधव यांनी संजना नामक महिलेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. संजना ही 45 वर्षाची असून तीचे घटस्फोट झाले होते. तसेच, तिच्या भावाचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाल्याने तिलाही आधाराची गरज होती. त्यामुळेच तिने माधव यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.पहा लग्नाचा व्हिडीओ…
आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या माधव यांनी म्हातारवयात लग्न केलेच. 1 महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाच्या फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांना संजना ही एक तरुण मुलगी वाटल्याने त्यांची टिंगल करण्यात येत होती. परंतु, त्या दोघांनी लग्न करून एकमेकांना मोठा आधार दिला आहे, असेच म्हणावे लागेल.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.