झी मराठी वाहिनीवर 2 नोव्हेंबर पासून “कारभारी लयभारी” नावाची एक नवीन मालिका सुरू झाली आहे. मालिकेची सुरुवात उत्तमरित्या झाली असून प्रेक्षकांकडून देखील छान प्रतिसाद मिळत आहे. आज आपण मालिकेतील एका अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत, जीचा मालिकेत महत्वाचा रोल असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून “कारभारी लयभारी” या मालिकेच्या एका प्रोमो मध्ये एका महिलेचा चेहरा दाखविण्यात येत नव्हता. त्या अभिनेत्रीचे नाव रश्मी पाटील आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मालिकेत रश्मी “शोना” नामक एका अभिनेत्रीचे पात्र साकारताना दिसून येत आहे.
रश्मी पाटील ही पुण्यात वास्तव्यास असून तिला अगोदरपासूनच अभिनायची आवड होती. परंतु या व्यतिरिक्त ती एक उत्तम डान्सर आहे. डान्स मधील लावणी प्रकारात ती परिपक्व आहे. त्यामुळेच मालिकेच्या सुरुवात देखील तिच्याच लावणीपासून करण्यात आली. तिने लावणी वर डान्स केलेले अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
रश्मी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव नसते, परंतु तिच्या काही फोटोज् मुळे ती युवा पिढीचे आकर्षण ठरत असते. “कारभारी लयभारी” मालिकेचा मुख्य नायक राजवीर याला ती तिच्या प्रेमात खेचताणा दिसेल. त्यामुळे मालिकेची नायिका पियू व राजवीर यांच्या प्रेमात ती कटूता आणताना दिसेल.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.