कलाकारांना मिळालेल्या पात्रानुसार अभिनय क्षेत्रात पुढे चालत राहावे लागते. कधी कधी काही कलाकार खऱ्या आयुष्यापेक्षा इतके वेगळे पात्र साकारत असतात की त्यांना ओळखणे देखील कठीण होते. सध्या सर्वांची आवडती मालिका “रंग माझा वेगळा” मालिकेतील अभिनेत्री बाबतीत देखील असेच काहीतरी आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीआरपी मध्ये टॉपला असणाऱ्या “रंग माझा वेगळा” मालिकेत दीपा नामक पात्र रेशमा शिंदे ही अभिनेत्री साकारत आहे. मूळची मुंबईची असलेली रेशमा ही अभिनय क्षेत्रात खूप वर्षांपासून काम करते. तिच्या यापूर्वी बंध रेशमाचे, लगोरी – मैत्री रिटर्न्स या रेशमाच्या काही गाजलेल्या मालिका होत्या.
रंग माझा वेगळा ही मालिका समाजात होत असलेल्या वर्णभेद यावर भाष्य करणारी आहे. मालिकेची अभिनेत्री रेशमा खऱ्या आयुष्यात गोरी असून देखील तिने दीपा नामक पात्र साकारून वर्णभेद करणाऱ्यास चपराक लगावली आहे. तिचे या मालिकेतील अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जाते.
अनेक प्रेक्षकांना मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात अशी दिसते हे पाहून धक्का बसला असेल. या मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले असून मालिकेत आशुतोष गायकवाड हा अभिनेता आहे. कार्तिक व दीपा यांच्या लग्नानंतर मालिकेत चढ उतार झालेले पाहायला मिळत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.