छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतील अशाच आहेत. एकता कपूरच्या कहाणी घर घर की, क्यूंकी सास भी कभी बहू थी अशा काही मालिकांनी टीआरपी चे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. तसेच, सोनी सब वाहिनीवरील “तारक मेहता का उलटा चष्मा” या मालिकेने देखील लोकप्रियतेची सर्वोच्च सीमा गाठली आहे.
“तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका 28 जुलै 2008 रोजी सुरू झाली. तेंव्हा पासूनच मालिकेत अनेक छोटे – मोठे बदल करण्यात आले. मागील दीड वर्षापासून मालकीची मुख्य व महत्वाची अभिनेत्री दिशा वकानी हिने मालिका सोडली होती. तेंव्हापासून मालिकेची लोकप्रियता कमी झालेली पाहायला मिळाली होती. परंतु आता मालिकेच्या फॅन्स साठी आनंदाची बातमी आहे.

मालिकेतील मुख्य पात्र दया भाभी वापस येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु यावेळेस दिशा वकानी दिसणार नसून मराठी डान्सर ऋतुजा जुन्नरकर ही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचे कारणही काही खास आहे. सोनी टीव्ही वाहिनीवरील “इंडियाज बेस्ट डान्सर” या डान्सच्या शोच्या एका भागात तारक मेहताची पूर्ण टीम आली होती.
या भागात ऋतुजाने दया भाभीचे हुबेहूब पात्र साकारले होते. त्यात ती दिशा वकानीची कॉपीच दिसत होती. डान्स करताना ज्यावेळी दिशाने “टप्पू के पापा” वर हावभाव दिले व तसेच दिशा सारखेच गरबा खेळला, ते पाहून जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी व निर्माते असित कुमार मोदी खूपच चकित झाले.
डान्सनंतर दोघांनी ऋतुजाची प्रशंसा देखील केली. ऋतुजाने डान्स नंतर प्रतिक्रिया देताना म्हटले की मला जेंव्हा दयाबेन करायचे आहे कळाले तेंव्हा मी चिंतेत होते. माझ्या नृत्य दिग्दर्शकाने हिम्मत दिल्यानेच हे मोठे पात्र साकारू शकले. तसेच असित कुमार मोदी यांनी तर ऋतुजाला मालिकेत येण्याची मागणी केली. जवळच्या सूत्राकडून समजते की ऋतुजा लवकरच मालिकेत दिसू शकते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.